खडकवाडी येथील आदर्श इंग्लिश मिडीयम School, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय विज्ञान दिन हा Sir C. V. Raman यांनी लावलेल्या रमन परिणाम या ऐतिहासिक शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फार्मसी विद्यालयाचे प्राध्यापक इले सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे महत्त्व पटवून दिले.
विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा तसेच पोस्टर कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, अवकाश संशोधन आदी विषयांवर आकर्षक पोस्टर सादर केली. तसेच विविध वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य अनिल ढोकळे सर यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक सुनील सर यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी साळवे मॅडम, कडनर मॅडम, पौर्णिमा मॅडम, अपेक्षा मॅडम, कुलकर्णी मॅडम, लोंढे सर, सुनील सर, भोर मॅडम, हारदे मॅडम, माया मॅडम, क्षीरसागर मॅडम, सोनाली खामकर मॅडम, संध्या मॅडम, निवडुंगे मॅडम, सरोदे मॅडम, हरीश सर, रिया मॅडम, रितू मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी अधिक कुतूहल निर्माण झाले.