इंदापूर- येथे राष्ट्रीय सरपंच संसद चे राष्ट्रीय प्रमुख समन्वयक योगेश दादा पाटील तसेच राष्ट्रीय सरपंच संसद चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाशजी महाले यांनी इंदापूर येथील अनिता खरात यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचा महिला दिनानिमित्त सन्मान केला यावेळी योगेश पाटील म्हणाले 8 मार्च महिला दिन ,खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान हा वर्षातील बाराही महिने व्हायला पाहिजे आणि 21व्या शतकात पुरुषापेक्षाही महिला आपल्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवताना दिसत आहेत, अनिताताई खरात यांच्यासारख्या सामाजिक काम समजून घेऊन त्या तळमळीने करणाऱ्या महिला या नक्कीच सर्व समाजाला बरोबर घेऊन पुढे जातील यात काही शंका नाही हे आम्ही त्यांच्या कामावरून व त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा पाहिला तर नक्कीच अनिताताई खरात या भविष्यात खूप मोठे सामाजिक काम उभं करतील त्यांच्या माध्यमातून अनेक तळागाळातील महिलांचे गरजूंचे प्रश्न सुटतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यांच्याशी चर्चा करताना नेहमीच शेतकरी महिला, युवावर्ग ,विद्यार्थी यांच्या विषयी त्या नेहमी आत्मीयतेने माहिती घेत असतात, त्यांच्याविषयी आपणाला काय नवीन करता येईल याची त्या अतिशय बारकाईने चौकशी करत असतात.म्हणूनच आज आम्ही पुण्यावरून खास अनिता ताईंचा सन्मान करण्यासाठी येथे आलो आम्हाला त्यांना भेटून महिलांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ व विकासाचे काम नक्कीच गतीने होईल असे वाटते,त्यांच्याकडे एक सामाजिक कामाचे विकासाचे व्हिजन आहे आणि नक्कीच भविष्यात त्यांच्या हातून लोकहिताचे विधायक काम घडेल यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाले सर व मी इंदापूर ला आलो मी पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्वच माझ्या माता-भगिनींना शुभेच्छा देतो. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्रदादा रेडके,नानासाहेब खरात विशाल म्हेत्रे, तात्याराम पवार आदी मान्यवर उपस्थितीत होते.