राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क: पारनेर


आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त 20 वर्षा पासुन पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर श्री क्षेत्र पळशी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटेची आरती करण्याचे भाग्य लाभले असे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी सांगितले आहे.

आज आषाढी एकादशी निमित्त त्यांनी पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर पळशी देवस्थानला भेट दिली असता त्यांच्या हस्ते आज आरती करण्यात आली. त्यांनी पारनेर तालुक्यामध्ये अनेक विकास काम केली आहे एक विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे त्यांनी आज प्रति पंढरपूर पळशी येथे विठ्ठल रुक्माई यांचे दर्शन घेऊन आरती करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे असे सांगितले आहे.
