सध्या सर्वत्र शैक्षणिक कागद पत्रे मिळवण्यासाठी सगळ्याच महा. ई. सेवा, सेतू कार्यालयात विद्यार्थी तसेच पालकांची मांदियाळी दिसून येत आहे, पण सुस्त झालेले प्रशासन तसेच कर्मचारी यांना याच काहीच घेणंदेणं नसलेच चित्रं निर्माण झालेचे दिसून येत आहे. गेली पंधरा दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने जवळजवळ दीड हजाराहूनही अधिकचे दाखले, त्यामध्ये, उत्पन्नाचे दाखले, डोमेसियल, अल्प भू धारक, एस ई बी सी, नॉनक्रिमिलेयर इत्यादी प्रकारचे दाखले मुलांच्या शैक्षणिक कामी, ऍडमिशन घेणेसाठी पूर्तता करावयाची आहे पण तहसील कार्यालयातून सर्व्हर डाउन या गोंडस कारणास्तव अद्याप पालक आणि विदयार्थ्यांची ससेहोलपट होत असतानाचे दिसून येत आहे.
तरी वरील सर्व कागदपत्रे अत्यंत महत्वाची असून ती जलद मिळतील कशी याकडे प्रशासन लक्ष देईल काय? पालक आणि विदयार्थ्यांची होणारी आर्थिक आणि दमणूक थांबवण्यासाठी प्रयत्न होईल काय? आणि यामध्ये वरिष्ठ लक्ष देतील काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.