नेवासा प्रतिनिधी:भाऊसाहेब बानकर

सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र पंढरपूर दिनांक 24.6. 2025 रोजी श्री शनेश्वर देवस्थान संचलित महंत उदासी महाराज आषाढी पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथून मोठ्या भक्ती भावाने विठुरायाच्या गजरात श्रीक्षेत्र पंढरपूरकडे सकाळी नऊ वाजता प्रस्थान झाले .

प्रस्थान वेळी हरिभक्त परायण विश्वास मामा गडाख देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर व सर्व विश्वस्त ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेब बनकर समस्त ग्रामस्थ व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दिंडीसाठी उपाध्यक्ष श्री विकास पाटील बानकर यांनी नाश्त्याचे नियोजन केले होते.
