अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामस्थांतर्फे प्रल्हाद गीते, अतिवृष्टीत नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हिवरे बाजार ग्रामस्थांच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते गीते यांचा सत्कार करण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळकी, अकोळनेर, खडकी, खंडाळा, सारोळा कासार या भागात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. या संकटाच्या वेळी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल हिवरे बाजार ग्रामस्थांनी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते त्यांचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. याच कार्यक्रमात हिवरे बाजार ग्रामस्थांनी ग्रामविकासाच्या कार्यात सातत्य राखत ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या अभिनव संकल्पनेतून मातृस्मृती वन मंदिरात १८०० देशी वृक्षांची लागवड सुरू केली असून वृक्षारोपणाचे उद्घाटनही पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर, सखाराम पादीर (सर), रोहिदास पादीर, अशोक गोहड, संजय पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.