निघोज येथील माता मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टमार्फत राबवल्या जात असलेल्या भाविकांसाठीच्या अन्नदानासाठी अन्नदान देणाऱ्या लोकांचा ओघ वाढत आहे यामध्ये प्रामुख्याने श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट उपाध्यक्ष व बाबासाहेब कवादपतसंस्थेचे अध्यक्ष माननीय वसंतरावजी कवाद साहेब व त्यांच्या सर्व विश्वस्त व सल्लागार मंडळ यांच्यावरील विश्वासामुळे व ग्रामीण असलेल्या अन्नदान कार्यक्रम व विकास कामामुळे माता मळगंगेच्या अन्नदानासाठी दररोज देणगीचा वाढत असून कालच श्री नवनाथ गोविंद ढवणकडून नवीन फोर व्हीलर स्विफ्ट गाडी घेतल्याबद्दल श्री मळगंगा प्रसादालयात अन्नदानासाठी रक्कम 2100 ची देणगी मिळाली याबाबत त्यांचे हार्दिक अभिनंदन व आभार मानण्यात आले अशा दानशूर व्यक्तीमुळे समाजात जातो टिकून आहे .
आपल्या या सद्गुणांच्या वाढीसाठी आता माता मळगंगा सदैव आपल्या पाठीशी राहो अशी सदिच्छा श्री मळगंगाग्रामीण ट्रस्टमार्फत त्यांचा सत्कार करून त्यांना उदंड दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून श्री मळगंगा ग्रामीण ट्रस्टमार्फत भाविकांना रक्कम तसेच अन्नदानासाठी धान्य भाजीपाला इत्यादी देण्याचे आव्हान करण्यात येत आहे गावातील बहुतांश लोक आपल्या वाढदिवसानिमित्त अन्नदानासाठी देणगी देत आहे तसेच नवीन खरेदी केलेल्या गाडीबाबत सुद्धा देणगी देत आहे याचे सर्वत्र कौतुक आहे अशाच प्रकारे अन्नदानासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे असे आव्हान श्री ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव माननीय शांताराम जी कळसकर यांनी केले आहे.