Homeताज्या घडामोडीमंगळवार दिनांक 3 फेब्रु 2026 रोजी कुदनर परिवारातील कन्या प्रमिला व चिंधे परिवारातील चि.ऋषिकेश यांचा शाहीविवाह सोहळा झाला मोठ्या उत्साहात साजरा:विविध राजकीय नेते मंडळींनी दर्शवली उपस्थिती
मंगळवार दिनांक 3 फेब्रु 2026 रोजी कुदनर परिवारातील कन्या प्रमिला व चिंधे परिवारातील चि.ऋषिकेश यांचा शाहीविवाह सोहळा झाला मोठ्या उत्साहात साजरा:विविध राजकीय नेते मंडळींनी दर्शवली उपस्थिती
संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक भाऊसाहेब भागुजी कुदनर यांची पुतणी व नानासाहेब भागुजी कुदनर यांची कन्या ची सौ का प्रमिला व प्रवरा सहकारी बँकेचे माजी संचालक हनुमंत भिकाजी चिंधे यांचे नातू व सुनील हनुमंत चिंधे यांचे चिरंजीव ऋषिकेश यांचा शुभविवाह सोहळा मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी संगमनेर तालुक्यातील साकुर येथे आशीर्वाद मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या शाही विवाह सोहळ्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. प्रथमच साकुर पठार भागामध्ये असा हा मोठा शाही विवाह सोहळा सर्वांना पाहायला मिळाला.
या शुभविवाह सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर,भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना माजी चेअरमन बाबा आहोळ, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकर पाटील खेमनर, भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक इंद्रजीत पाटील खेमनर, भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक रामदास धुळगंड सर, सुरेश सेठ कान्होरे सचालक कृषी उत्पन बाजार समिती संगमनेर,इंजिनीयर किशोर पाटील खेमनर,युवा नेते अनमोल पाटील खेमनर, सुजित पाटील खेमनर, माजी सभापती महिला बालकल्याण समिती मीराताई शेटे, माजी पंचायत समिती सदस्या संगीता उत्तम कुदनर, बाळासाहेब निवृत्ती ढोले,सरपंच अंबी खालसा, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सागर, युवा नेते बाळासाहेब सागर, शिंदोडी गावचे सरपंच एकनाथ खामकर,उपसरपंच पोपट सोमा कुदनर, माजी उपसरपंच उत्तम तात्याभाऊ कुदनर,संगमनेर युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण उत्तम कुदनर, चेअरमन बाबूलाल शेख माजी चेअरमन सखाराम दरू कुदनर , सागर शेठ कान्होरे , मयूर गडगे तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुदनर परिवाराने आलेल्या सर्व मान्यवरांचा भव्य असा सत्कार केला. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी लग्न मंडपातील सुंदर जोडी प्रमिला ऋषिकेश यांना शुभाशीर्वाद दिले.
यावेळी जसा इंद्र दरबार भरला असा सोहळा पाहायला मिळाला यावेळी कुदनर परिवाराने सुंदर असं नियोजन केले होते त्यामुळे या सोहळ्याचा सर्वांनी चांगल्या प्रकारे आनंद घेतला खूप छान स्नेहभोजन ठेवण्यात आले होते सर्वांनी या स्नेही भोजनाचा लाभ घेतला अशा प्रकारे कुदनर परिवारातील प्रमिला व चिंधे परिवारातील ऋषिकेश यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.