सविस्तर गुप्ता शेती श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी वाशी नवी मुंबई यांनी निघोज येथे 42 वी शाखा उद्घाटन गुरुवार दिनांक 25 रोजी माता मळगंगेच्या मंदिरासमोर सत्यनारायण महापूजा घालून केली .यावेळेस संस्थेचे अध्यक्ष श्री शंकर शेठ पिंगळे साहेब यांनी संस्थेची माहिती देताना संस्थेची निघोज शाखा 42 असून अजून नियोजित शाखा पाच आहेत संस्थेची आर्थिक स्थिती व माहिती खालील प्रमाणे असून सभासद एकूण एक लाख 21 हजार 104 ठेवी 1205 कोटी ते 33 लाख 91 हजार 969 व संस्थेने केलेले कर्ज वितरण 1005कोटी 36 लाख 80 हजार 525 संस्थेच्या स्वमालकीच्या सोळा शाखा असून या उद्घाटन प्रसंगी निघोज गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संस्थेचे सभासद तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री शंकर शेठ पिंगळे यांचे सहकारी संचालक चंद्रकांत सहदेव वराडी हरिश्चंद्र यशवंत थोरात डी जीएम अरुण काशीद तसेच संस्थेचे सभासद दैनिक वसुली प्रतिनिधी तसेच विभागीय अधिकारी श्री नवनाथ शंकर पवार साहेब महेंद्र गाढवे इत्यादी उपस्थित होते.
निघोजच्या आर्थिक उलाढाली मध्ये या संस्थेचा मोठा सहभाग राहील अशी ग्वाही विभागीय अधिकारी यांनी दिली संस्थेला ऑडिट वर्ग असतच मिळालेला असून निघोज मध्ये निश्चितच सर्व ठेवीदार सभासदांना याचा लाभ होईल याची ग्वाही त्यांनी दिली ही माहिती ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांनी दिली.