खडकवाडी (ता. पारनेर) श्री बबनराव नारायण ढोकळे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खडकवाडी येथे आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 14 वर्षे व 17 वर्षे (मुले / मुली) या वयोगटात झालेल्या स्पर्धेत परिसरातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध व क्रीडाभावनेत पार पडली. 14 वर्षे मुली गटात आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खडकवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिकलठाण यांनी द्वितीय तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव सावताळ यांनी तृतीय क्रमांक मिळविला. 14 वर्षे मुलांमध्ये आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खडकवाडी प्रथम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिकलठाण द्वितीय, शासकीय आश्रम शाळा, पळशी तृतीय तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडवे खुर्द यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला.
17 वर्षे मुली गटात नूतन माध्यमिक विद्यालय, खडकवाडी प्रथम, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खडकवाडी द्वितीय तर शासकीय आश्रम शाळा, पळशी तृतीय ठरले. 17 वर्षे मुलांमध्ये आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खडकवाडी प्रथम, नूतन माध्यमिक विद्यालय, खडकवाडी द्वितीय, शासकीय आश्रम शाळा, पळशी तृतीय तर श्यामजी बाबा विद्यालय, गुरेवाडी यांनी चतुर्थ क्रमांक पटकाविला. स्पर्धेत बेस्ट रेडर म्हणून अथर्व गागरे यांचा गौरव करण्यात आला. तर बेस्ट डिफेंडर म्हणून ईश्वरी गागरे, जीविका गागरे, श्रुष्टि काकडे व संध्या कातोरे यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमास प्रो कबड्डी खेळाडू समीर ढोकळे व ऋषिकेश गागरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समीर ढोकळे यांनी भूषविले. स्पर्धेचे पंच म्हणून शिंदे सर व लोंढे सर यांनी काम पाहिले व समालोचन सुनील ढोकळे सर व लेंभे सर यांनी केले तसेच स्कोर बोर्ड व टायमरची जबाबदारी हुले मॅडम व साळवे मॅडम यांनी पार पाडली. सांगता प्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री. ॲड. डॉ. बाबासाहेब उर्फ किशोर ढोकळे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व, शिस्त, संघभावना व चिकाटी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी गावातील मान्यवर विकास रोकडे, डॉ. रतन काळभोर (पुणे), संजय कर्नावट, बि. डी. शेठ ढोकळे, प्रताप रोकडे, संतोष शिंदे, अमोल रोकडे, बी. टी. खणकर, यशवंत हुलावळे, शिवाजी रोकडे, अरुण गागरे, भाऊसाहेब गागरे, सुदाम आहेर आदी उपस्थित होते. तसेच सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक कारंडे सर, बाबाजी ढोकळे सर, नवनाथ गागरे सर, ज्ञानेश्वर हारदे सर, आहेर सर, काळे सर, हुलावळे सर, गाडेकर सर, सारोप्ते सर, खामकर सर, कवटे सर, कवादे सर आदी उपस्थित होते. स्पर्धेस पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, खडकवाडी येथील सर्व सेवक वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले.