हृदय भेदक विरह गीत, निसर्गाशी जवळीक साधणारे शब्द, कवीच्या भावना तीव्र असतात, त्या शब्दा शब्दात ठासून भरलेल्या आहेत.पी.पी.म्यझिक समुहाचे श्रीराम घडे यांचे गाण्याबद्दल उत्तम नियोजन,सुरीली चाल,मधुर श्रवणीय सतत ऐकत राहवा असा आवाज गायक विकास साळवे आणि प्रसिद्ध संगीतकार चंदन कांबळे यांचे संगीत अप्रतिम, आणि वयाच्या ६७ वर्षी तरुण तरुणींना, वृध्दांना भुरळ पाडणारे गीतकार भारत कवितके यांचे गीत,ठेका धरायला लावणारे गाणे, कवी आपल्या या विरह गीतात आपल्या प्रियेसीच्या ( राणीच्या) विरहाने व्याकूळ होऊन तिची भेट होत नसल्याने चंद्र सूर्याला विचारतो अरे चंद्र सूर्य हो तुम्ही माझ्या राणीला कुठे पाहिले आहे का? पाना , फुलांनों कुठे, कशी असेल माझी राणी तुम्ही तरी मला सांगा, जीवनाच्या अंधारल्या वाटेत चाचपडत राहिलों, राणीच्या आठवणी मनात जपत राहिलो,तिची भेट होत नसल्याने कवीला ती भेटण्याची आशा निरर्थक वाटू लागते,सतत तिच्या भेटीची ओढ मनाला लागली आहे, गावातल्या आमच्या भेटीच्या काही खूणा दिसतात का कवी ने गावात फिरून पाहिले, ज्या बागेत आम्ही दोघे भेटायचो त्या बागेत कवी फिरुन आला, कदाचित ती तिथे कवीची वाट पाहत बसली असावी असे कवीला वाटते,तिची भेट झाली नाही म्हणून निराश झालेला कवी म्हणतो माझ्या मनाला आज कळले ” तुटणे” काय असते, आणि राणी शिवाय जीवन जगणे काय असते?, खूप कठीण असते, कवी वादळ वार्याला विचारतो तुम्हाला माझी राणी दिसली का? पूर्वी आम्ही दोघांनी मिळून सर्व ऋतू अनुभवले आहेत, पाहिले आहेत, आता मी दिशा दिशाला तीला शोधले, कवीला सारे जग लहान वाटते, त्यात तिचा शोध घेतला पण नाही सापडली.
परत ढगाला, पावसाला कवी विचारतो पावसा तुझ्या मुळे माझी राणी भिजली होती का? तुला ती दिसली का? राणीचा स्वभाव कणखर आणि जिद्दी जरी असला तरी ती कवी साठी फारच हळवी व्हायची, कवी व राणी यांची शेवटची भेट झाली तेव्हा सांजेची वेळ होती, आणि त्या वेळी निरोप घेताना उद्या भेटू अशी शपथ घेतली,पण….पण…ती पुन्हा आलीच नाही…. म्हणून कवी रात्र व दिवसाला विचारतो की,माझी राणी परत येईल का? कवीचे विरह शब्द रसिकांच्या जिव्हारी लागतात, आणि मनापासून हलकेच बोलून जातात… नक्कीच भेटेल तुम्हाला तुमची प्रिय राणी…… आम्हाला ती दिसली की तुम्हाला नक्कीच कळवू तुम्हाला…. तुमच्या मोबाईलवर…..