महाराष्ट्र सरकार आणि धनगर समाजाचे नेते धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी बाबत सकारात्मकता दाखवित नाहीत ,अशी खंत धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली.मुंब ई मधील एका धनगर समाजाच्या कार्यक्रमात ही खंत व्यक्त केली आहे.भारत कवितके पुढे म्हणाले की,” विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासन आणि धनगर समाजाचे नेते धनगर समाजाला एसटी आरक्षण अमंलबजावणी बाबत सकारात्मक होते, वातावरण ही पोषक होते,सरकारची सकारात्मक भूमिका, धनगर समाजाच्या नेत्यांची आक्रमकता, आणि समाज बांधवाची शिगेला पोहोचलेली उत्सुकता, या वरुन वाटत होते, आरक्षण अमंलबजावणी लवकर होईल,पण तसे झाले नाही,त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आरक्षण अमंलबजावणी बाबत पंधरा दिवसांत निर्णय घेऊन परिपत्रक काढू,पण तसे झाले नाही, निवडणूका संपल्या तसे धनगर समाज बांधवांचे आरक्षण अमंलबजावणी चे स्वप्न हे स्वप्नच राहिले, अनेक ठिकाणी काही संघटनांनी लढण्याचे प्रयत्न केले.
अगदी वळवाच्या पावसाप्रमाणे, आंदोलनाची धार बोथट होत गेली, कमी होत गेली,यावर सरकार, धनगर नेते आणि समाज बांधव यांनी पुन्हा सकारात्मक भूमिका घेऊन आरक्षण अमंलबजावणी बाबत त्वरित निर्णय घ्यावा,” यावेळी धनगर समाजातील पुरुष व महिला उपस्थित होते.