Homeताज्या घडामोडी“मराठीच्या अभिमानासाठी एका व्यासपीठावर ठाकरे बंधू – राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब जानकर साहेबांच्या हस्ते ऐक्याचा पेढा!”
“मराठीच्या अभिमानासाठी एका व्यासपीठावर ठाकरे बंधू – राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब जानकर साहेबांच्या हस्ते ऐक्याचा पेढा!”
मराठी माणसाच्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांमध्ये अनेक वेळा मतभेद झाले, वाटा वेगळ्या झाल्या आणि मार्ग बदलले; पण भाषा, संस्कृती आणि अस्तित्वाच्या प्रश्नावर आज इतिहासातली एक वेगळी पायरी पार पडताना दिसली — मराठीच्या मुद्द्यावर मुंबई वरळी येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले!
या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थिती लावून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांनी दोघा ठाकरे बंधूंना आपल्या हाताने पेढे भरवून त्यांचे स्वागत करून एक आगळा संदेश दिला — “मराठीसाठी जेव्हा ऐक्याची गरज असते, तेव्हा मतभेद झाकून ठेवावेत आणि मनभेद विसरावेत.”
जानकर साहेब हे केवळ एका पक्षाचे अध्यक्ष नसून, ते महाराष्ट्राच्या सामाजिक समन्वयाचे नायक आहेत. त्यांच्या मनात मराठी माणसाविषयी असलेली आपुलकी आणि त्यासाठी तयार असलेले नेहमीचे योगदान हेच आज या ऐक्यदर्शनाच्या प्रसंगी अधोरेखित झाले.
ठाकरे बंधूंनी देखील या व्यासपीठावरून पुढील काळात मराठीच्या प्रश्नावर एकत्र काम करू असे स्पष्ट शब्दांत सांगितले. ही केवळ एकत्र येण्याची घटना नव्हे, तर हे मराठी जनतेला दिलेले नवे वचन आहे — की महाराष्ट्राच्या मातीसाठी, भाषेसाठी आणि संस्कृतीसाठी आपण भांडणार, लढणार आणि टिकवून ठेवणार!
या प्रसंगी विविध पक्षांचे मान्यवरही उपस्थित होते. परंतु उपस्थितांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब साहेबांचे स्थान विशेष लक्षवेधी ठरले. कारण त्यांनी दिलेला सद्भावना आणि समन्वयाचा संदेश — हाच खरा आजच्या महाराष्ट्राला आवश्यक असलेला मूलमंत्र आहे.
✍️ निष्कर्षतः…
> “भाषा टिकली तर महाराष्ट्र टिकेल, आणि महाराष्ट्र टिकला तर मराठी माणूस टिकेल!” हे लक्षात ठेवून राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांचे प्रयत्न, संवादाचा ध्यास, आणि एकत्रतेचे आवाहन हेच मराठी माणसाच्या भविष्यासाठी ठरतील एक नवा आधारस्तंभ.
श्री. भगवान ढेबे, कामगार नेते – राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने, मराठी अस्मितेसाठी समर्पित एक कणखर आवाज!