द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांस्कृतिक सभागृहांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी विचार मंचावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शंकर मिसाळ(जिल्हा मुख्य अग्निशमन अधिकारी), श्री प्रल्हाद गीते (सहाय्यक पोलीस निरीक्षक), रामदास ताठे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नांदेड), श्री बाबासाहेब काळे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर), श्री अन्सार शेख (अध्यक्ष द युवा ग्रामीण पत्रकार संघ), जीवन मोहिते (उपाध्यक्ष-द युवा ग्रामीण पत्रकार संघ), श्री बाळासाहेब कोठुळे (राज्य सचिव द युवा ग्रामीण पत्रकार संघ), हेमंत साठे-राज्य संघटक, डॉक्टर मंगल ताई सासवडे-महिला राज्य सचिव, शकील मणियार (पुणे जिल्हा प्रमुख पत्रकार संघ) हे उपस्थित होते. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शंकर मिसाळ म्हणाले की द युवा ग्रामीण पत्रकार संघाने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केलेला गुणगौरव सोहळा हा सामाजिक उंची वाढवणारा व समाज कार्याला दिशा देणारा आहे. आणि जिल्ह्याचे प्रशासन सांभाळताना अधिकारी म्हणून आम्ही समाजाच्या मदतीला निश्चितच धावून जाण्याचा प्रयत्न करू, कठीण प्रसंगांमध्ये जनतेने आम्हाला संपर्क करावा. निश्चितच आम्ही मदत करण्याचे प्रमाणिक प्रयत्न करू व पत्रकार संघाला त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी आपल्या भाषणात म्हटले पोलीस अधिकारी म्हणून मी समाजाचे मदतीसाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करत आहे.
समाजामध्ये काम करताना पत्रकार नेहमीच पोलिसांच्या उनी वाकडे बोट दाखवतात परंतु आज पत्रकार संघाने मात्र या ठिकाणी पोलिसांना सन्मानाची वागणूक व पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. पोलीस आणि पत्रकार यांचे कार्य सामाजिक सलोखा घडवून आणणे हेच आहे. यानंतर श्री रामदास ताठे साहेब यांनी द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कौतुकास्पद कार्याचे तोंड भरून कौतुक केले. आपण समाज जोडण्याचे काम पत्रकार संघाच्या माध्यमातून करत आहात, या पवित्र कार्याला मनस्वी शुभेच्छा दिल्या. यानंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष अन्सार शेख यांनी संघटनेची उद्दिष्ट व पत्रकार संघाच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपल्या मनोगता मधून केला. संघाचे स्थापनेनंतर समाजामध्ये सर्वसमावेशक काम पत्रकार संघाने केले आहे तसेच वंचित व शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व पत्रकारांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी पत्रकार संघ प्रामाणिकपणे कार्य करीत असून, 2023 मध्ये लावलेले हे रोपटे आज त्याचा वटवृक्ष होऊ पाहत आहे. महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये संघटनेचे जाळे उभे राहिले आहे. त्यामध्ये महिलांचा सन्मान, पारितोषिक वितरण, वृक्षारोपण, रक्तदान, मेळावे या माध्यमातून पत्रकार संघाने आपले कामकाज उभे केले आहे असे ते म्हणाले. सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांनी केले तर संघाचे उपाध्यक्ष जीवन मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश काळे यांनी केले.