मेहकर तालुक्यातील भोसा भिवापूर गट ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य विरुद्ध सरपंच असा संघर्ष पाहायला मिळत असून बुधवारी दिवसभरात मेहकर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्याच्या दालनात हाय व्होल्टेज ड्रामा झाला असून तीन दिवसात तीन ग्रामसेवक या गावाला देण्यात आल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.
भोसा ग्रामपंचायत चे सहा सदस्य व शेकडो नागरिक गटविकास अधिकारी दिनकर खरात यांच्या दालनात उपस्थित झाले होते त्यांनी भोसा गावासाठी अंकुश ठाकरे हेच ग्रामसेवक राहावे म्हणून आग्रह धरला होता तर दुसऱ्या बाजूला वादग्रस्त सरपंच चित्रलेखा दिनकर चव्हाण यांनी ग्रामसेवक अंकुश ठाकरे यांची बदली न झाल्यास महिला आयोगाकडे तक्रार करण्याची तक्रार मेहकर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे 23 जुलै रोजी केली होती मात्र या तक्रारीची दखल गटविकास अधिकाऱ्यांनी घेतली नव्हती दरम्यान अज्ञात पदाधिकाऱ्यांचा गट विकास अधिकारी यांना फोन आला या फोनमुळे सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवक अंकुश ठाकरे यांना रजेवर पाठविण्यात आले सरपंच चित्रलेखा चव्हाण यांनी 31 जुलै रोजी ग्रामसेवक वानखेडे यांना मासिक मीटिंग घेण्यासाठी एक दिवसाचे आदेश देण्यात आले तर 2 ऑगस्ट पासून भोसा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक म्हणून मोतीराम राहते यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला आहे त्यामुळे भोसा ग्रामपंचायत साठी तीन दिवसात तीन ग्रामसेवक दिल्याने भोसा ग्रामपंचायत आंतरिक चर्चेचा विषय ठरत आहे भोसा ग्रामपंचायतच्या दलित वस्ती निधी खात्यामध्ये 11 लाख रुपये 15 व्या वित्त आयोगाच्या खात्यात वीस लाख तर ग्रामपंचायतच्या सामान्य फंडात पाच लाख रुपये असा एकूण 36 लाखाच्या निधीसाठी सरपंच विरुद्ध ग्रामपंचायत सदस्य असा संघर्ष पाहायला मिळत आहे.