सविस्तर वृत्त असे की निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी निघोज व परिसरातील गणेश मंडळांनी जोरदार असे आरास केली आहे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तसेच भजन लोकगीत यांची जोरदार तयारी दररोज मंडळाकडून केली जात आहे अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाला गर्दी होत आहेनिघोज व परिसरात जवळपास 50 गणेश मंडळांनी बाप्पाची स्थापना केली असून दररोजच्या धार्मिक आरती भजनी कार्यक्रमांनी निघोजचे वातावरण अतिशय मंगलमय असे झाले आहे प्रमुख गणेश मंडळात कन्हैया दूध उद्योग समूह गणेश मंडळ आपला गणपती गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत रवी रणसिंग यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून यामध्ये डान्स स्पर्धा आयोजित केलेली आहे बालगोपाळ गणेश मंडळ वाघजाई गणेश मंडळ विघ्नहर्ता गणेश मंडळ संदीप पाटील गणेश मंडळ वाघजाई गणेश मंडळ महालक्ष्मी गणेश मंडळ लामखडे वरखडे वस्ती गणेश मंडळ लाळगे मळा गणेश मंडळ अशा विविध एकूण जवळपास 50 गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना सालाबाद प्रमाणे केली असून मोठ्या प्रमाणात आरास केली आहे.
परिसरातून लोक गणेश देखावा पाण्यासाठी येत आहेत साईधाम गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष श्री शुभम सुरेश राव निघोज कर यांनी मंडळातर्फे नव्याने अनेक उपक्रम राबवले असून लहान कलाकारांना उत्साहित करण्यासाठी अनेक प्रकारचे सांघिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तसेच बाल गोपाळ गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष सोमनाथ जी वरखडे साहेब यांनी यावर्षी विविध ठिकाणची भजने कार्यक्रम आयोजित केला आहे.