विद्यार्थ्यांनी आई-वडिलांविषयी सतत कृतज्ञता बाळगावी. रामचंद्र सुपेकर .
पारनेर तालुका प्रतिनिधी:सुरेश खोसे
पारनेर – मळगंगा पब्लिक स्कूल मध्ये जरी इंग्रजी भाषेतून शिक्षण देत असले तरी मराठी भाषा ही आपली मातृभाषा असल्याने तिचा आपण सार्थ अभिमान बाळगला पाहिजे , असे गौरवद्गार निघोज च्या पठारवाडी येथील मळगंगा पब्लिक स्कूल संस्थेचे अध्यक्ष प्रमोद खोसे यांनी व्यक्त केले .
पठारवाडी येथील मळगंगा पब्लिक स्कूल मध्ये मराठी भाषा दिन, मातृ पितृ पूजन, फन मार्केटिंग या तीन ही एकत्रित कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते , या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रमोद खोसे सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी साहित्यातील अनेक ग्रंथ व त्यांच्या लेखकांची माहिती दिली. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सेवानिवृत प्राचार्य हभप रामचंद्र महाराज सुपेकर सर म्हणाले की, आई-वडिलांच्या मुळेच आपण घडलो आहोत, हे सांगण्याचा कितीही प्रयत्न केला , तरी त्यांचे वर्णन करता येत नाही , त्यांच्या उपकाराचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. त्यातून कोणीही उतराई होऊ शकत नाही. म्हणून आई-वडिलांविषयी विद्यार्थ्यांनी सतत कृतज्ञता बाळगावी. हे सांगताना त्यांनी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आई-वडिलांविषयीचे प्रेम सांगितले. ते विद्यार्थ्यांना फारच भावले. यावेळी मातृ पितृ पूजनाचा कार्यक्रम अतिशय भावनिक झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांची पूजा केली. प्राचार्या सौ. खोसे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचारी यांनी कष्ट घेतले. यावेळी पालक,मेजर किसन कारखिले, पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किसनराव सुपेकर, दीपक सालके, गणेश सालके, राकेश सालके, गोपीनाथ रसाळ, विकास लंके, मंगेश वराळ, शांताराम कवाद, मोहनराव काळे, शिवाजीराव घोडे, पंकज घोडे, दीपक रासकर, सुभाष वराळ, किरण सुपेकर, पालक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.