सविस्तर वृत्त अशी की सध्या कल्याण एसटी डेपोचा बांधकामामुळे त्यांनी एसटी कल्याण एसटी विठ्ठलवाडी येथे प्रवाशांना उतरून देतात व कल्याणला गाडी जात नाही असे सांगतात त्यामुळे लोकांची एकच गडबड उडून जाते व त्यात जेष्ठ नागरिकांची अतिशय कठीण होते कारण असे की एसटीवर बोर्ड कल्याण असल्यामुळे लोक कल्याण गाडी बस स्टॉप परंतु विठ्ठल वाडी पर्यंत बस जाते असे सांगण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना न्यायला जास्त होत रिक्षा करावी लागते.
प्रवाशांना जादा पैसे द्यावे लागतात तसेच रेल्वेने जाणे कठीण होते वयोवृत्त असल्यामुळे कृपया एसटी डेपो वाले यासाठी त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी किमान एक बस विठ्ठलवाडी कल्याण कल्याण विठ्ठलवाडी सुरू करावी अन्यथा याबाबत ज्येष्ठ नागरिकाकडून व प्रवाहाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अशी माहिती जेष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांनी पत्रकार द्वारे दिली आहे.